Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पार्सल देण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली; डिलिव्हरी बॉय जेरबंद

Advertisement

नागपूर : पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने अटक केली आहे. घटनास्थळी आरोपीने घाईगडबडीत सोडून दिलेली सायकल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव युवराज गुप्ता (वय १८) असे असून तो एका ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो तक्रारदाराच्या घरी पार्सल देण्यासाठी गेला असताना ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी त्याच्या नजरेत भरली. त्यानंतर त्याने चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवान नगर येथील शीला रेसिडेन्सीमध्ये घडली. बुधवारी दुपारी आरोपी पार्सल घेऊन सदानंद कांबळे यांच्या घरी पोहोचला. त्यांनी कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे सांगितले. मात्र, पार्सलवरील पत्ता पाहत असतानाच आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पळ काढला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने आरोपीने स्वतःची सायकल घटनास्थळीच टाकून पायी पलायन केले.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तेथे मिळालेल्या सायकलीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने आरोपीचा शोध घेत त्याला राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची साखळी, मोबाईल फोन आणि इतर मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

प्राथमिक चौकशीत आरोपी बारावीत नापास झाला असून पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज होती. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून आर्थिक अडचणीमुळे त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.