नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करून अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या तरुणावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि संबंधित तरुण एकाच परिसरात शेजारी राहतात. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याने त्यांच्यात बोलणे बंद होते. याच पार्श्वभूमीवर संबंधित तरुण अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील भाषा वापरत असे आणि हातवारे करून अश्लील इशारे करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
१२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या कथित प्रकाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी सूरज अग्रवाल (वय ३०) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करत असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी सुरू आहे.



