Published On : Tue, Apr 24th, 2018

पावसाळापूर्व नाल्यासफाई कामांना वेग द्या

nullah Cleaning

नागपूर: पावसाळ्यात पावसाचे पाणी त्वरित वाहून जाता यावे यासाठी प्रभागातील नाल्यांची सफाई तातडीने करा. सफाई कार्याला वेग द्या, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नुकताच त्यांनी प्रभाग क्र. १ चा दौरा करून पावसाळापूर्व नाल्यासफाई कार्याचा आढावा घेतला. परिसरातील नागरिकांशीही त्यांनी यावेळी चर्चा केली. परिसरात नेहमी ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या सखल भागात यावेळी पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी झोनल अधिकाऱ्यांना दिले.

अनेक नाल्यांमध्ये कचरा तुंबला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. सर्व नाल्यांतील हा कचरा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.