Published On : Fri, Jan 20th, 2023

नागपूर शहर जिल्हा काॅग्रेस विकासजी ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन

मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून जिल्हाधिकारी कार्यालयावर नारे,निर्देशने आंदोलन...
Advertisement

नागपूरःनागपूर शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष व आ.श्री.विकासजी ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय,सिव्हील लाईन,नागपूर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तोडणा-या अधिका-यावर कारवाई करुन नव्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बिरचा मुंडा भवन नियोजित जागी बाध्ंाण्यासाठी तसेच बेरोजगारी व प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना आ.अॅड.अभिजीत वंजारी,प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार,प्रदेश सचिव संदेश सिंगलकर,सचिव संजय महाकाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

काॅग्रेसच्या कार्यकत्र्यानी कार्यालयासमोर निर्देशने करतांना पेट्रोल डिझलचे दर कमी झालेच पाहिजे,बेरोजगाराना रोजगार मिळालाच पाहिजे, आॅबेडकर स्मारक तोडणा-यावर कारवाई झालीच पाहिजे असे जोरदार नारे लावण्यात आले. केद्र व राज्य सरकारने जिवनाश्यक वस्तु चे दर वाढल्याने सामान्य नागरिकांचे जिवन जगने कठिन झाले आहे.

या नारे,निर्देशने आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष नंदा पराते,महिला अध्यक्षा नैश अली,अनिरुध्द पांडे,,रमन पैगवार,माजी नगरसेवक रमेश पुणेकर,संदीप सहारे,शिला तराळे,मनोज सांगोळे,नेहा निकोसे,दिपक वानखेडे, भावना लोणारे,रश्मी धुर्वे,ब्लाॅक अध्यक्ष दिनेश तराळे,राजकुमार कमनानी,पंकज थोरात,पंकज निघोट,ज्ञानेश्वर ठाकरे,सुनिल पाटिल,युवराज वैद्य,सुनिता ढोले,ईरशाद मलिक,गोपाल पटटम,योगेश कुंजलवार,अशोक निखाडे,अॅड.अभय रणदिवे,प्रशांत धाकणे,किशोर गीद,विवेक निकोसे,उषा डवरे,मंदा वैरागडे,संजय सेलोट, सुभाष मानमोडे, मनीष उमरेडकर,नरेश खडसे, लंकेश ऊके,शुभम आमदरे,वैभव काळे,राजेश सहारे,मिलींद सोनटक्के,सरफराज खान,वसीम खान,फिरोज खान,अनमोल लोणारे, सहित मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.