Published On : Thu, Sep 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकडे येणारा २५ किलो गांजा ANTF ने पालांदूरमध्येच पकडला;दोघांना अटक

Advertisement

नागपूरकडे येणारा २५ किलो गांजा ANTF ने पालांदूरमध्येच पकडला;दोघांना अटक

नागपूर : नागपूरमध्ये विक्रीसाठी आणला जाणारा तब्बल २५ किलो ४३० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANTF) भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पकडला. ओडिशातून भंडारा मार्गे नागपूरकडे आयशर वाहनातून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आयशर वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

या कारवाईत नागपूरच्या झिंगाबाई टाकळी येथील गुलाम वाजिद गुलाम वजीर आणि कपिल नगर येथील वाहनचालक शेख शहाबाज शेख सरवर यांना अटक करण्यात आली. जप्त गांजाची किंमत सुमारे १२ लाख ७१ हजार रुपये, तर आयशर वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ३२ लाख ९६ हजार रुपये आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात हा गांजा नेमका कुठे आणि कोणाला पुरवला जाणार होता, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास ANTF नागपूरकडून सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.