| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Apr 28th, 2019

  नागपुरात मध्ये ट्रान्स्पोर्टर बॉबी माकन चे अपहरण करून हत्या, कोंढालीजवळ फेकला मृतदेह

  नागपूर: नागपुरात एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर अमरावती मार्गावर कोंढालीजवळ एक अज्ञात मिळाला मृतदेह मिळाला होता. त्यानंतर तपास केल्यावर हा मृतदेह बॉबी ऊर्फ चॅटि माकन याचा असल्याचा उघड झाले आहे.

  बॉबी हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि जरीपटका पोलिस ठाण्यात ते हरविल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. मृत बॉबी यांची इनोव्हा गाडी (क्र. mh 31 cm 7979) बेवारस अवस्थेत जरीपटका पोलिस स्टेशनच्या मागे सापडली होती.

  मृत बॉबी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असू्न काटोल येथील ग्रामीण रुग्णालय पोस्टामार्टमसाठी नेण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून बॅाबी यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. नागपूरच्या जरीपटका भागातील जगत सेलिब्रेशन हॉलजवळ बॉबी माकन राहत होते आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145