Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाढदिवसाच्या जल्लोषाला रक्तरंजित वळण; १८ वर्षीय युवकाची चाकूने हत्या!

जरीपटका परिसरात जुन्या वादातून दोन गट भिडले; मध्यस्थी करणारा मित्रही जखमी
Advertisement

नागपूर : वाढदिवसाचा आनंद साजरा करत असतानाच जुन्या वादातून झालेल्या हाणामारीने रक्तरंजित वळण घेतले. जरीपटका परिसरातील कुशीनगर येथील एनआयटी उद्यानाजवळ १८ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. राजवीर सोहनकुमार शर्मा असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेत त्याचा मित्र नयन सोनबरसे हाही जखमी झाला आहे.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राज इलमकर याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र एकत्र आले होते. केक कापल्यानंतर सर्वजण तेथे गप्पा मारत असताना राजवीर शर्मा हा आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरून तेथून जात होता.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जुन्या वादातून राजवीरची काही युवकांसोबत बाचाबाची झाली. सुरुवातीला वाद शांत झाला आणि सर्वजण तेथून निघून गेले. मात्र, काही वेळाने राजवीर हा आपल्या अन्य साथीदारांसह पुन्हा घटनास्थळी आला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.

वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. यावेळी राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोगरे यांनी राजवीरवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला राजवीर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.

Advertisement

राजवीरवर हल्ला होत असल्याचे पाहून त्याचा मित्र नयन सोनबरसे हा मध्यस्थी करण्यासाठी धावून आला. मात्र, त्याच्यावरही हल्ला करण्यात आल्याने तो जखमी झाला.

दोन्ही जखमींना तातडीने विम्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर राजवीर शर्मा याला मृत घोषित केले. नयन सोनबरसे याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतकाची आई शालू शर्मा यांच्या तक्रारीवरून राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोगरे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध हत्येसह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या हत्येमागील जुन्या वादाचे नेमके कारण काय होते, हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वाढदिवसाच्या आनंदासाठी एकत्र आलेल्या तरुणांमध्ये जुन्या वादातून झालेल्या हाणामारीने एका तरुणाचा जीव घेतला. नागपुरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.