Published On : Sat, Jun 5th, 2021

नागपुरातील सामाजिक कार्यकर्ता मंगेश झाडेना “कोरोना योद्धा” अवार्ड

Advertisement

नागपुर– संपुर्ण देशभरात कोरोनाने आंतक व थैमान माजवला असून गोरगरिबांवर उपासमारीची पाळी आली. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामहामारी रोगामुळे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या व गोरगरिबांच्या समस्या लक्षात घेता मंगेश वामनराव झाडे यांनी अन्नदान व मास्क तसेच Vitamin C tablet वाटप करण्यास सुरुवात केली. म्हणूनच मंगेश झाडे यांना स्टॅंडिंग कमिटी चेअरमॅन एनएमसी चे प्रकाश भोयर व एनआयटी ट्रस्टी यांच्या शुभ हस्ते मंगेश झाडे यांना अवार्ड देण्यात आला.

वर्धा रोड वरील , मनिषनगर येथील जयंती नगरी बिल्डींग – 5 पासून अन्नधान्याच्या किट्स व भोजनदान वाटपाला सुरुवात झाली. मंगेश वामनराव झाडे यांनी गरजू , गोरगरीब लोकांना धान्य वाटप व अन्न वितरण जवळ जवळ १२ हजार लोकांना वाटले. झाडे यांनी खुप मोठे सामाजिक कार्य केले. त्यामध्ये मास्क आणि विटामिन सी टॅबलेट सुद्धा वाटप करण्यात आले. त्यासोबतच भोजनही देण्यात आले. मनिषनगर पोलिसांनाही जेवण देण्यात आले. यावेळी अभिजित मुजुमदार आणि एफ/एम आँरेज नागपूर यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. सोबतच जयश्री बोडे, अर्चना ठाकरे आणि जयंती नगरीतील-5 मधील रहिवासींचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. हे कार्य करत असताना मंगेश झाडे यांनी तेथील रहिवासी यांचे आभार मानले.

Gold Rate
22 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,33,300/-
Gold 22 KT ₹ 1,24,000 /-
Silver/Kg ₹ 2,09,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

म्हणूनच नागपूरचा सिटी हीरो म्हणून अवार्ड एचडीएफसी बँक तर्फे देण्यात आला होता. त्यानंतर मंगेश वामनराव झाडे यांनी नागपुरातील नागरिकांना १२ हजार लोकांना जेवण व मास्क, आणि विटामिन सी, टॅबलेट चे वाटप करण्यात आले.व आजही गरिबांना मदत करत आहे. मंगेश वामनराव झाडे यांचे महापौर दयाशंकर तिवारी व प्रकाश भोयर यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. म्हणूनच त्यांना टाळेबंदीत “कोरोना योद्धा” पुरस्कार देण्यात आला असून प्रमाणपत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement