Published On : Sat, Apr 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर वकील संघटना निवडणूक: अध्यक्षपदी प्रकाश जैस्वाल, सचिवपदी गुल्हाने यांची सरशी

Advertisement

नागपूर : न्यायदानाचे पवित्र ठिकाण मानल्या जाणाऱ्या जिल्हा न्यायालय परिसरात वकील संघटनेची निवडणूक उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या थरारक लढतीत अ‍ॅड. प्रकाश जैस्वाल यांनी विजय मिळवत अध्यक्षपदावर कब्जा केला, तर सचिवपदी अ‍ॅड. अनिल गुल्हाने यांनी बाजी मारली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश जैस्वाल यांना १,२१८ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी अ‍ॅड. अनिल देशमुख यांना १,१४४ मते मिळाली. एकूण १५ मते अवैध ठरली.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या निवडणुकीत अध्यक्ष, महासचिव (सचिव), कोषाध्यक्ष, ग्रंथालय प्रमुख, दोन उपाध्यक्ष, दोन सहसचिव आणि नऊ कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १७ पदांसाठी मतदान झाले. एकूण ३,३९० मतदारांपैकी २,८४८ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून सुमारे ८४ टक्के मतदानाची नोंद झाली.

२५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर न्यायालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement