वर्धा: नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्सची ट्रॅक्सला धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. नांदेड येथून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाणाऱ्या क्रुजरला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने हा अपघात झाला. देवळी मार्गावरील सेलसुरा जवळ रात्री दोन वाजता सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात क्रूजरमधील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
            Published On            : 
            Sat, Sep 30th, 2017             
          
		  	
            By            Nagpur Today 
                      
        नागपुरातील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या गाडीला अपघात; चार जण जागीच ठार
Advertisement
			







			
			