Published On : Thu, Feb 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रॉपर्टी टॅक्स कमी करून देण्याच्या नावाखाली लाच, एसीबीकडून दोघांना रंगेहाथ अटक

Advertisement

नागपूर : प्रॉपर्टी टॅक्स कमी करून देण्याचे आमिष दाखवत ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सापळा रचून करण्यात आली.

नागपूर महानगर पालिकेच्या हनुमान नगर (झोन क्रमांक ३) येथील महसूल निरीक्षक प्रमोद वसंतकुमार मोगरे (वय ५०) आणि खासगी व्यक्ती राकेश नरेंद्र डोडके (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रारदाराने रामेश्वरी परिसरात एक फ्लॅट खरेदी केला होता. सदर फ्लॅटचा प्रॉपर्टी टॅक्स आपल्या नावावर नोंदवून घेण्यासाठी त्यांनी हनुमान नगर झोन कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी राकेश डोडके याने तक्रारदारास दरवर्षी ४,५०० रुपये कर भरावा लागेल, असे सांगितले.

त्यानंतर डोडके याने दूरध्वनीवर संपर्क साधून, हा कर १,८०० रुपयांपर्यंत कमी करून देण्यासाठी स्वतःस व वरिष्ठ प्रमोद मोगरे यांना ३,५०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

Advertisement

या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने Anti-Corruption Bureauकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीने प्राथमिक पडताळणीनंतर सापळा रचला. चर्चेनंतर ३,५०० रुपयांऐवजी ३,००० रुपये स्वीकारण्याचे ठरविण्यात आले.

नियोजनानुसार रचलेल्या सापळ्यात राकेश डोडके याला प्रमोद मोगरे यांच्या सांगण्यावरून ३,००० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ व ७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे मनपातील कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges