Published On : Thu, Apr 11th, 2019

नागपूर विभागातील सहा लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान, 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज

विभागात सरासरी 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज

नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झाले आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या अंतीम टक्केवारीची माहिती पोलिंग पार्टीद्वारे संपूर्ण माहिती विधानसभा मतदारसंघनिहाय गोळा करण्यात येत आहे.

विभागातील सहाही लोकसभा मतदारसंघात आज झालेल्या मतदानाच्या अंदाजानुसार सरासरी मतदानाची शक्यता पुढीलप्रमाणे आहे. – यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 58 टक्केपर्यंत मतदानाची शक्यता आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघात – 58 ते 60 टक्के, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 65 ते 68 टक्के, गडचिरोली-चिमूर – 70 ते 72 टक्के, भंडारा-गोंदिया 69 ते 71 टक्के तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघात सरासरी 65 टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यवतमाळ-वाशिम सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.69 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतदाना दरम्यान कुठेही अनूचित प्रकार झाला नसून निवडणूक यंत्रणेसोबतच पोलिसदलातर्फे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.