Published On : Mon, Oct 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १२२ कोटींचे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय; कामठीसह ग्रामीण भागाला मोठा दिलासा

रविदास नगरात ७ एकर जागेवर ‘जी प्लस २’ रुग्णालय उभारणार
Advertisement

नागपुरात १२२ कोटींचे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय; कामठीसह ग्रामीण भागाला मोठा दिलासा

नागपूर : कामठी आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. तब्बल १२२ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाला मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रविदास नगर परिसरातील सुमारे ७ एकर शासकीय जागेवर हे ‘जी प्लस २’ रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

यापूर्वी ड्रॅगन पॅलेस परिसरातील जागेचा विचार करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही जागा बदलून रविदास नगर येथील जागा निश्चित करण्यात आली. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या रुग्णालयाचा फायदा कामठीसह रामटेक, मौदा, पारशिवणी आणि कन्हान परिसरातील नागरिकांना होणार आहे. नव्या इमारतीत अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, आयसीयू, व्हेंटिलेटर युनिट, डायलिसिस सेंटर, विस्तृत ओपीडी आणि इनडोअर विभाग उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल आणि डायलिसिससाठी नागपूर शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे.

दरम्यान, सध्याच्या जुन्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा वापर सर्व सुविधांनी युक्त प्रसूती रुग्णालय म्हणून करण्यात येणार आहे. येथे नवजात शिशू अतिदक्षता कक्षासह स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भविष्याचा विचार करून पूर्वीच्या ‘जी प्लस १’ आराखड्याऐवजी ‘जी प्लस २’चा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.