नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत एक चोरीची घटना समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट 5 या घटनेचा छडा लावत एका मुलाला ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याचे काबुल केले असून यात त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.
माहितीनुसार, पीडित अमित पन्नालाल यादव याचा पानठेला मानकापूर चौक, कल्पना टॉकीजच्या समोर आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5 च्या दरम्यान घडली असेल. चोरट्याने चोरीचे पानहँडल,सिगारेट, परफ्युम आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली.
या सर्व वस्तूंची एकूण किंमत ७० हजार रुपये आहे. पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस तपासात समोर आले की एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या साथीदारासोबत मिळून ही चोरी केली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ज्यात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा माल त्याच्या साथीदाराकडे असल्याचे त्याने सांगितले. गुन्हे शाखा युनिट 5 हे प्रकरण मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केले असून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.