
नागपूर – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद अशा दोन्ही स्तरांवर भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
नागपूर जिल्हा – नगराध्यक्ष पदांवर भाजपची सरशी आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार नागपूर जिल्ह्यातील१० नगराध्यक्ष पदांवर भाजपचा विजय
काँग्रेस, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रत्येकी १ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत निकाल-
मौदा – प्रसन्न तिडके (भाजप)
कन्हान-कांद्री – सुजित पानतावणे (भाजप)
निलडोह – भूमिका मंडपे (भाजप)
येरखेडा – राजकिरण बर्वे (भाजप)
गोधनी – रोशना कोलते (भाजप) (महिला)
बेसा-पिपळा – कीर्ती बडोले (भाजप)
महादुला – हेमलता ठाकूर (भाजप)
७ पैकी सर्वाधिक नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा
नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल-
कळमेश्वर – अविनाश माकोडे (भाजप)
सावनेर – संजना मंगळे (भाजप)
रामटेक – बिकेंद्र महाजन (शिवसेना)
मोहपा – माधव चर्जन (काँग्रेस)
काटोल – अर्चना देशमुख (शेकाप–राष्ट्रवादी आघाडी)
बुटीबोरी – सुमित मेंढे (गोंडवाना गणतंत्र, काँग्रेस समर्थित)
खापा – पीयूष बोरडे (भाजप)
राजकीय अर्थ
महायुतीतील घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले असतानाही नागपूर जिल्ह्यात भाजपने संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे. येत्या काळात नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.








