Published On : Thu, Jul 25th, 2019

नाग नदीचे पाणी आटले, पाण्याअभावी शेतपिके धोक्यात

कामठी : -ऐन पावसाळ्याच्या हंगामात पावसाने पूर्णपणे उघाड दिल्याने पाऊस रुसला की निसर्गाच कोपला या चिंतेत तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होऊन बसला आहे तर अशा परिस्थितीत सिंचनाची सोय असलेले सदन शेतकरी कसेबसे शेती करीत आहे त्यातच तालुक्यातील विहिरगाव येथील नाग नदीचे पाणी अडवून ते पाणी पाईप लाईन द्वारे कोराडी कडे वळती करण्यात आले परिणामी कामठी तालुक्यातील ग्रामीण भागाकडे वाहून जाणारी नाग नदी ही कोरडी होऊन नदीचे पाणी आटले त्यामुळे या नाग नदीच्या तीरावर असलेल्या पांढुर्ण, खेडी, आडका, तीतूर यासारख्या गावातील शेतीपिकाचे पाण्याअभावी नुकसान होत या गावातील शेतीचे प्रभावीत असे नुकसान होत आहे.

या नागनदीच्या पाण्याच्या आधारे कसेबसे सिंचनाची मदत होत असल्याने शेतीसाठी उपयोगी ठरत होते मात्र मागील काही दिवसांपासून या नागनदीचे पाणी संबंधित विभागाच्या मनमानी कारभारा मुळे कोराडी कडे वळती करण्यात आल्याने या गावातील नदी पूर्णता आटून कोरडी पडल्याने गावात पाण्याची समस्या निर्माण होत शेतपिकासाठी मदतशील ठरणारे या पाण्याअभावी शेतपिकांचे नुकसान होत आहे.एकीकडे निसर्गाचा दगा तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा मनमाणीचा दगा अश्या परिस्थितीत या गावातील शेतकऱ्यांनो जगावे की मरावे ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

तेव्हा शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त स्थिती लक्षात घेता नागनदीला येणारे पाणी दुसरीकडे वळती न करता नागनदीचे पाणी पूर्ववतरीत्या सुरू करावे अशी मागणी विजय खोडके.,निरंजन खोडके, शेतकरी मंगेश मानमोडे,लिलाधर चांभारे,सुभाष खेडकर,.विषणु नागमोते.,विजय चौधरी,राजू ठाकरे..कपिल खेडकर, अतुल बाळबुधे, अमोल खोडके आदींनी केली आहे.

संदीप कांबळे कामठी