Published On : Fri, Jun 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला ३ लाख रुपयांनी गंडविले

Advertisement

नागपूर : एका लाईकसाठी ५० रुपये मिळतील असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला ३ लाख रुपयांनी गंडविल्याची माहिती आहे. या प्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

माहितीनुसार, गोरेवाडा येथील रहिवासी फिर्यादी अंकीत बदानी (२९) यांचे फुटवेअरचे दुकान आहे.२३ जून रोजी ते दुकानात असताना आरोपीने व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज केला. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून स्क्रीन शॉट पाठविल्यास प्रत्येक लाईकला ५० रुपये मिळतील अशी ऑफर दिली. मुदतीच्याआत दिलेले काम पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष अंकिताला दाखविण्यात आले.

Gold Rate
22 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100 /-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,55,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने सुरुवातीला अंकितच्या खात्यात प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये पटविले. त्यानंतर आरोपीने अंकितला मोठी रक्कम गुंतविण्यास सांगितले. जास्त रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, त्यामुळे अंकीतने जास्त रक्कम गुंतविली. ३ लाख ७ हजार रुपये गुंतविताच आरोपीने मोबाईलचा बंद केले.अंकितला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणाची त्याने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला असून तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement