Published On : Thu, Oct 15th, 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षीय भेटी

भंडारा : माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिम या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील गावात प्रत्यक्ष कार्यक्रमाचे अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे याकरिता पर्यवेक्षकिय भेट देवुन, गावातील नागरिकांना आरोग्य बाबद मार्गदर्शन करुन जनजागृती केली.

कोविड-19 या आजाराच्या अनुषंगाने शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या आजाराच्या प्रादुर्भावाचे राज्यातील गांभिर्य लक्षात घेता राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाची दुसरी फेरी ही १४ ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधी मध्ये राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उध्देश मोहिमेमध्ये पथकाव्दारे गृहभेटीत संशयीत कोविड-१९ रुग्ण तपासणी, अति जोखमीचे ( Co-morbid condition ) व्यक्ती ओळखुन त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी, आयएलआय रुग्णांचे गृहभेटीव्दारे सर्वेक्षण, कोविड-१९ रुग्ण तपासणी व उपचार, गृहभेटीव्दारे प्रत्येक नागरीकांचे कोविङ-१९ बाबत आरोग्य शिक्षणदेणे हे आहे.

सदर कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात एकुण ८६८ पथक कार्यरत असून, सदर पथक घरोघरी जावुन घरातील सर्व व्यक्तींची थर्मल गण व पल्स ऑक्सीमिटरनी तपासणी करीत आहेत व आरोग्य संदेश देत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत आज रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ४२ अधिकारी व इतर कर्मचारी यांनी प्रत्येक तालुक्यातील गावात प्रत्यक्ष कार्यक्रमाचे अंमलबजावणी योग्यरितीने होत आहे याकरिता पर्यवेक्षकिय भेट देवुन, गावातील नागरिकांना आरोग्य बाबद मार्गदर्शन करुन जनजागृती केली. तरी समस्त नागरीकांनी सहयोग करुन सदर पथकाव्दारे आपली तपासणी करुन घ्यावी व पथकाला योग्य ते सहाकार्य करावे. जेणेकरुन कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहिम यशस्वी होईल. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. जिल्हा परिषद, भंडारा यांनी केले आहे.