Published On : Sun, Apr 19th, 2020

वाडी नवणीतनगर येथील मोकाट व बिमार डूकारांची नगरपरिषद तर्फे धरपकड प्रारंभ!

शेकडो नागरिकानी केलेल्या तक्रारीची दखल!

वाडी(प्र) वाडी नगरपरिषद च्या आरोग्य विभागातर्फे सध्या सर्व लक्ष करोना व लॉकडाऊन कडे केंद्रित आहे ,मात्र नुकतीच क्षेत्रातील नवणीतनगर परिसरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांना घातक अशी बिमारी ची लागण झाली व त्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याची शेकडो नागरिकांनी वाडी नगरपरिषद च्या आरोग्य विभागाकडे मौखिक व लेखी तक्रार नोंदवून त्वरित कार्यवाहिच्या मागणीची दखल घेत मोकाट व आजारी डुकरे पकडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

नवणीतनगर येथील नागरिक आधीच मोकाट डुकराच्या विचरणाने त्रस्त आहेत.सध्या करोना ची देखील दहशत आहे.दरम्यान नागरिकांना असे निदर्शनास आले की या मोकाट डुकरांना कोणत्यातरी गंभीर आजाराने ग्रासले आहे.त्या मुळे देखील आजाराचे विषाणू पसरण्याची भीती लक्षात घेता नागरिक घाबरले.


पण लॉकडाऊन मुळे एकत्रित येऊ शकत नव्हते शेवटी सोशल माध्यमाचा सहारा घेऊन निर्णय घेतला.युवक मनोज गजभिये,पंकज भोवते यांनी पुढाकार घेऊन निवेदन तयार करून नियमांचे पालन करीत नागरिकांच्या स्वाक्षरी गोळा केल्या व वाडी नप ला येऊन हे निवेदन व स्थिती कथन करून कार्यवाहीची मागणी केली.

निवेदन व विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्याधिकारी जुंमाँ प्यारेवाले यांनी आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे यांना योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले.,त्या नन्तर आरोग्य विभागाने नियोजन करून डूकरे पकडणार्या कंत्राटदारांना कार्यवाहीची परवानगी दिली.या पथकाने नवणीतनगर परिसरात शुक्रवार पासून धडक मोहीम राबवित ही मोकाट व आजारी डुकरे जेरबंद करायला प्रारंभ केला.या न प च्या कार्यवाहिमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून,ही कार्यवाही पूर्णत्वास न्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पथका ने आता पर्यंत 40 डुकरे पकडली असलयाची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.