Published On : Thu, Sep 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेसाठी मनपाचा ‘नागपूर निती’ संघ

Advertisement

– ग्रीन व्हिजीलचे मेहुल कोसूरकर असणार कर्णधार
– स्वच्छतेसाठी १७ सप्टेंबरला स्वच्छता रॅली

नागपूर: १४ ता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने देशपातळीवर ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘नागपूर निती’ या नावाने नागपूर महानगरपालिका सहभागी होणार आहे. त्याअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरात विविध उप्रक्रम राबविल्या जाणार असून, या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (१४ सप्टेंबर) शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची बैठक पारपडली.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांच्यासह झोनल अधिकारी व स्वयंसेवी संस्थाने पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला आठ व स्वच्छ भारत अभियान -2 ला एक वर्ष झाले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत अठराशे हुन अधिक शहर सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या संघाला नागपूर नीती असे नाव देण्यात आले असून, ग्रीन व्हिजील संस्थेचे मेहुल कोसुरकर कर्णधार असणार आहे. या स्पर्धे अंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे शनिवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्वच्छता रॅली काढल्या जाणार आहे. ही स्वच्छता रॅली अमरावती रोड स्थित विद्यापीठ चौकापासून ते अंबाझरी स्थित विवेकानंद स्मारक ते दीक्षाभूमी अशी असणार आहे. रॅली दरम्यान नागरिक आपल्या श्रमदानाने मार्ग स्वच्छ करीत चालतील. यासाठी युवावर्ग, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर नावनोंदणी करावी असे आवाहन श्री जोशी यांनी केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.