Published On : Wed, Sep 11th, 2019

स्वामी ‍ विवेकानंद दिग्‍विजय दिना निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपूर: शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म परिषदेत आपल्या अमोघ वाणीने विश्व बंधुत्वाचा संदेश देवून संपूर्ण जगाचे लक्षवेधून घेणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या 125 व्या दिग्विजय वर्षपूर्ती दिना निमित्त आज नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेता कार्यालयातील स्वामी विवेकानंदाच्या तैलचित्राला माजी स्थायी समिती अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी गलिच्छवस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीच्या सभापती श्रीमी तारा (लक्ष्मी) यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय तिवारी, सहा.जनसंपर्क अधिकारी श्री.प्रदीप खर्डेनवीस, दिलीप तांदळे आदी उपस्थित होते.