वायु प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा व नीरी एकत्रित काम करणार
– नीरीच्या विविध कामांची महापौरांनी घेतली माहिती
नागपूर : नागपूर शहराचे वायु प्रदूषण व अन्य प्रदूषण कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि सी.एस.आय.आर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (सी.एस.आय.आर – नीरी) एकत्रित काम करतील, असा विश्वास महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी नीरी संस्थानाला दिलेल्या भेटी मध्ये व्यक्त केला. नागपूर मनपा आणि नीरी एकमेकांच्या सहकार्याने नागपूर शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले.
नागपूर शहराच्या वायु गुणवत्ता सुधारणेकरीता नागपूर महानगरपालिकेला नीरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहकार्य मिळत आहे. “नीरी” देशातील अग्रगणी व नावाजलेली संस्था आहे आणि देशाच्या अनेक शहरात वायु प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला जात आहे. नीरी तर्फे तयार केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (२८ जून) रोजी घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे व कार्यकारी अभियंता (पर्यावरण) श्रीमती श्वेता बॅनर्जी उपस्थित होते. महापौर व अन्य पदाधिका-यांनी याप्रसंगी नीरी परिसरात वृक्षारोपण केले.
महापौर म्हणाले नीरी तर्फे दरवर्षी मनपासाठी नागपूर शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला जातो. नीरी तर्फे तयार करण्यात आलेल्या “स्मार्ट ट्री” हवेत असलेल्या धूरचे कणांना पसरु देत नाही. ग्रीन दहन घाटाच्या माध्यमातुन शहरातील वायु प्रदूषण कमी होऊ शकते. नीरीच्या वैज्ञानिकांनी तयार केलेली वायु प्रदूषण नियंत्रण मशीन चा सुध्दा गर्दीच्या ठिकाणात प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यांनी इमारतीच्या बांधकामात निघणारा कचरा आणि नदी – तलावात होणा-या पान कांदाला नियंत्रित करण्यासाठी सुध्दा चर्चा केली. पोहरा नदीच्या काठालगत वृक्षारोपण करण्यासाठी नीरी तर्फे सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापौर म्हणाले की मनपा तर्फे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. डीजेल मध्ये सी.एन.जी किट लावून प्रदूषण कमी केले जात आहे. नाग नदी ला स्वच्छ करण्यासाठी सीवरेज ट्रीटमेंट प्लांट लावले जात आहे. कदाचित नागपूर देशातले पहिले शहर आहे ज्यांनी आपला नाल्याचा पाण्यावर ट्रीटमेंट करुन महाजेन्कोला विकले आहे. त्याव्दारे मनपाला महसुल मिळत आहे.
सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी विविध प्रकाराचे आयुर्वेदीक वृक्षांची लागवड करुन नवीन प्रकारच्या पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची सूचना केली. विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी भांडेवाडी येथील कच-यापासून लोकांना होणा-या त्रासाबद्दल चर्चा केली.
नीरीच्या प्रमुख वैज्ञानिक बी. पदमा एस. राव आणि संगीता गोयल यांनी सांगितले की, वाहनांमुळे बर्डी, धंतोली, कॉटन मार्केट, सोमलवाडा, गांधीबाग, इंदोरा, जरीपटका, महाल, घाट रोड, वर्धमाननगर, पारडी येथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात जास्त प्रदूषण बस, ट्रक, चारचाकी वाहन, कार, जीप अश्या मोठ्या वाहनांमुळे आणि दुचाकी वाहनांमुळे होत आहे. यासाठी अशा वाहनांची वारंवार तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासोबतच बांधकाममुळे आणि दहन घाटांमुळेसुध्दा हवेत प्रदूषण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नीरीचे डॉ.लालसिंग म्हणाले, हवेत होणाऱ्या प्रदूषाणाला रोखण्यासाठी विशिष्ट वृक्ष लावले तर याच्यावर नियंत्रण आणू शकतो तसेच ध्वनि प्रदूषण सुध्दा कमी करु शकतो. त्यांनी नीरीमध्ये लावण्यात आलेल्या विविध प्रकाराचे वृक्षांची माहिती दिली.
नीरी तर्फे प्रमुख वैज्ञानिक डॉ.पदमा राव, डॉ. आत्या कपले, डॉ.रीता धापोडकर, डॉ. संगीता गोयल, डॉ.साधना रायलू, डॉ. अतुल वैद्य, डॉ. बिनीवाले आणि डॉ. लालसिंह उपस्थित होते. मनपा तर्फे भीमराव राऊत, संदीप लोखंडे उपस्थित होते.
