Published On : Sat, Jul 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मोरभवन बस डेपोमधील खड्डे बुजविण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सीताबर्डी येथील ‘आपली बस’च्या मोरभवन बस डेपोची मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी शनिवारी (ता.4) संयुक्त पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्तांनी ताबडतोब डेपोमधील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, श्री. विजय होले, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, ऑपरेशन व्यवस्थापक श्री. राजीव घाटोळे, चलो प्रोजेक्टचे श्री. अजय कुमार, बस ऑपरेटर्स यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान मनपा आयुक्तांनी मोरभवन डेपोमधील खड्ड्यांमध्ये चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्यावर तातडीने रोलिंग करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाचा जोर ओसरताच, मुरूम टाकलेल्या भागावर पुन्हा रोलिंग करून मनपाच्या हॉटमिक्स विभागातर्फे डांबरीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सूचना केल्या. डेपोच्या सुरक्षेसाठी गरजेनुसार शिफ्टप्रमाणे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या ही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

याशिवाय, आयुक्त डॉ. विपीन यांनी डेपोतील प्रवासी निवारागृह आणि स्मार्ट टॉयलेटचीही पाहणी केली. ही स्वच्छतागृहे सीएसआरच्या माध्यमातून चालविण्याबाबत त्यांनी सांगितले. डेपोमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा वाढविण्यासोबतच, परिसराच्या सुशोभीकरणासाठी बांबूची झाडे लावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.