Published On : Wed, May 23rd, 2018

मनपा आयुक्तांनी केली नदी स्वच्छता अभियानाची पाहणी

Advertisement

Nag River

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे लोकसहभागातून ७ मे पासून नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान सुरू असलल्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी (ता.२३) केली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील तिन्ही नद्या स्वच्छ करण्याचे काम महापालिकेद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. पोरा नदी स्वच्छता अभियानाचे काम एअरपोर्ट सेंटर पॉईंट, बेसा रोड, नरसाळा आणि नागनदी स्वच्छता अभियानाचे काम लोकांच्या शाळेजवळ सुरू आहे. आतापर्यंत तिन्ही नद्या मिळून १२ किमी स्वच्छता करण्यात आली आहे. तिन्ही नदीतून एकूण २६४१२ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.

नदी स्वच्छता अभियानाबाबत आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.