Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुंब्रा-दिवा रेल्वे दुर्घटना दुर्दैवी; अपघाताची चौकशी सुरू ;मुख्यमंत्र्यांची माहिती

Guardian Minister clarifies – Transfer requests will not be accepted during 'Jansamvad'; citizens turn up in large numbers for public grievance redressal
Advertisement

ठाणे : मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी (९ जून) सकाळी भीषण अपघात घडला. सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून अचानक आठ प्रवासी खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दोन फास्ट लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे कळवा, ठाणे सामान्य रुग्णालय आणि शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दिवा-मुंब्रा दरम्यान घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.

मुख्यमंत्र्यांनी यासोबतच रेल्वे विभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केल्याची माहितीही दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मृतांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या प्रकारानंतर लोकलमधील गर्दी, फास्ट ट्रेनमधील प्रवासातील असुरक्षितता आणि रेल्वेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.