| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 18th, 2019

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

  एक्स्प्रेस वे आज (शुक्रवारी) दोन तास बंद राहणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. रसायनीजवळ गँट्रीज बसवण्याच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद असणार आहे. या वेळेत एक्स्प्रेस वेवरील वाहतूक शेडुंग फाटा येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे.

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर ओव्हरहेड गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर शुक्रवारी (18 जानेवारी) गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद असणार आहे.

  याआधी गुरुवारी (10 जानेवारी) मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. पुणे कॉरिडॉरवर 17/695 आणि 23/870 येथे ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम करण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद होती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145