Published On : Thu, Aug 31st, 2017

मुंबईतील भेंडीबाजारमध्ये चारमजली इमारत कोसळली

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग ही चारमजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 35 रहिवासी अडकल्याची भीती आहे.

मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग होती. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास कोसळल्याची माहिती आहे.

इमारतीत 9 कुटुंब राहत असल्याची माहिती असून आतापर्यंत तिघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.


अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आरसीवाला इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे. 26 जुलै 2017 रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत पडली होती. तर गेल्या आठवड्यात चांदिवलीत इमारत कोसळली होती.