Published On : Tue, Jul 13th, 2021

महावितरणने पकडली २५ लाखाची वीज चोरी

Advertisement

नागपूर: महावितरणच्या भरारी पथकाने फेटरी परिसरात थेट आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या स्टोन क्रशर मालकाची वीज चोरी पकडली असून त्याला दंडासह एकूण २५ लाख रुपयांचे देयक देण्यात आले आहे . यावेळी सदर स्टोन क्रशर मालक मागील एक वर्षांपासून आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.

महावितरणच्या भरारी पथकास फेटरी परिसरात स्टोन क्रशर चालकांकडून आकडे टाकून वीज चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकाने या ठिकाणी पळत ठेवली. मिळलेली माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यावर महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकून आकडे टाकून सुरु असलेली वीज चोरी रंगेहाथ पकडली.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्टोन क्रशर मालक कोणाच्याही निर्दशनास येणार नाही याची दक्षता घेऊन मागील एक वर्षांपासून आकडा टाकून वीज चोरी करीत होता. यामुळे महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे निद्रशर्नास आले . वीज चोरी पडल्यावर पंचनामा केला असता स्टोन क्रशर मालकाने मागील वर्षभराच्या कालावधीत एकूण १ लाख १२,०३५ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मूल्याकंन केले असता १४ लाख ७८ हजार ९१२ रुपये आणि तडजोड शुल्क १० लाख रुपये असे एकूण २५ लाख ७८ हजार ९१२ रुपयांचे देयक महावितरणच्या भरारी पथकाने स्टोन क्रशर मालकास दिले.

स्टोन क्रशर मालकाने महावितरणकडून देण्यात आलेल्या देयकाची रक्कम तात्काळ भरून पुढील कायदेशीर कारवाई टाळली. महावितरणच्या भरारी पथकाचे नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुमितकुमार, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास नवघरे, दक्षता आणि सुरक्ष विभागाचे विश्वनाथ बिसने, एकता पारधी यांनी वरील वीज चोरी पकडली.

Advertisement
Advertisement