Published On : Wed, Mar 27th, 2019

श्रीमती के. सारदा देवी नागपूरसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक

– रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध

नागपूर : निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीमती के सारदा देवी यांची नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती के सारदा देवी या आंध्रप्रदेश कॅडरच्या 2005 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी त्या रवीभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक श्रीमती के सारदा देवी यांचा मुक्काम रवीभवन कॉटेज क्रमांक सी-6 येथे असून त्यांचा भ्रमण ध्वनीक्रमांक 9022208763 असा आहे. सर्व मतदारांना त्या सकाळी 11 ते 1 या वेळेत रवीभवन येथे उपलब्ध आहेत. रवीभवन येथील दूरध्वनी क्रमांक 0712-2522876 यावरही संपर्क साधता येईल.