Published On : Wed, Apr 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आ.प्रवीण दटके यांनी आयुक्तांसोबत घेतला नदी-नाले सफाई अभियानाचा आढावा

सफाई अभियान पावसाळ्यापूर्वी सुनियोजित पद्धतीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी
Advertisement

नागपूर, : मनपाद्वारे सुरू असलेल्या नदी नालेसफाई अभियानाला अधिक प्रभावीपणे राबवून नदी नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सुनियोजित पद्धतीने सफाई करण्यात यावी, नदी नाल्यातील गाळ व माती काढण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी. तसेच नदी नाले सफाई अभियांन येत्या १५ जून पर्यंत राबविण्यात यावे, असे निर्देश आमदार श्री.प्रवीण दटके व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित विभागाला दिले. त्यानंतर आयुक्तांनी सायंकाळी नदी सफाईची प्रत्यक्ष पाहणी केली.

मध्य नागपुरातील नदी-नाले सफाई अभियानासह लहान, मोठ्या सर्व नाल्यांच्या स्वच्छता कामांचा आढावा आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.29) पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत गांधीबाग-महाल झोन सभापती श्री. उमा देशमुख, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, नगरसेवक श्री. बंडू राऊत, श्री. सचिन नाईक, ऍड. संजय बालपांडे, श्री. श्रीकांत आगलावे, श्री रामभाऊ आंबुलकर, श्री. सुबोध आचार्य, श्री. उदयपुरकर, श्रीमती गौर, श्री. कल्पक भनारकर, श्री. छोटू भोयर, मनपाचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह कार्यकारी अभियंता, दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत आ. प्रवीण दटके यांनी बैद्यनाथ चौक ते जगनाडे चौक दरम्यानच्या नदी व नाल्याच्या सफाईची आढावा घेतला. तसेच बजेरिया ते हत्तीनाला दरम्याच्या सफाईच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. पावसाळ्याला सुरुवात होण्यासाठी अजून दीड महिन्याचा कालावधी असून, पावसाळ्यापूर्वी नाग नदी व लगतच्या नाल्याची सफाई पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना पावसळ्यात त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार श्री. प्रवीण दटके यांनी यावेळी दिले. तसेच नदी नाल्यांच्या सफाई दरम्यान निघणाऱ्या माती आणि गळा काढण्यासंदर्भात योग्य नियोजन करण्यात यावे, नदीच्या लगत गाळ व माती ठेवण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी. आवश्यकता असल्यास नदी सफाई साठी अधिक जेसीबी, पोखालेन व इतर मशीनचा वापर करावा असे निर्देश श्री. दटके यांनी दिले. याशिवाय मध्य नागपुरातील नाल्यांची वेळेत आणि प्रभावी सफाई करणे, पाणी तुंबण्याच्या समस्या टाळणे, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये च्या सूचना आ. श्री.दटके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर आयुक्त डॉ. विपीन यांनी उपस्थितांना सांगितले की, आवश्यक असल्यास सीएसआर फंडातून मशीन घेण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सर्व सफाई अभियानाची पाहणी करणार असल्याचेही सांगितले. बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील नदी व नाले सफाई, नदी लगतच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्ती, नदीपात्रातील गाळ काढण्यासह नाग नदी व नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

Advertisement

आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी

आयुक्त डॉ. विपीन यांनी सायंकाळी धंतोली झोन, गांधीबाग झोन आणि लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या नदी सफाई अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केली. आयुक्तांनी बैद्यनाथ चौक, तुळशीबाग चौक, रेशमीबाग चौक, जुना बगडगंज, कुंभारटोली परिसरातील नदी नाले सफाईची स्थिती जाणून घेतली. तसेच नाग नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून साफसफाईच्या कामांची स्थिती जाणून घेत पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता येण्याचे निर्देश दिले. तसेच नदी नाले सफाईसाठी आवश्यक उपाययोजनांकरण्याचा करण्याचेही सूचित केले. यावेळी नगरसेवक , श्री रामभाऊ आंबुलकर, श्री. सुबोध आचार्य, मनपाचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, सहायक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह कार्यकारी अभियंता, दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मातीचा वापर वृक्षारोपणासाठी

नदी-नाले सफाई अभियानांतर्गत नदीपात्रातून निघणाऱ्या मातीचा उपयोग वृक्षारोपणासाठी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.विपीन यांनी दिले. सदर माती ही रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी वापरावी असे निर्देशही आयुक्तांनी संबधित विभागाला दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.