Published On : Wed, Oct 27th, 2021

खासदार करंडक एकांकिका स्पर्धा

28 ते 30 ऑक्टोबर होणार स्पर्धा

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नाने खासदार सांस्कृतिक समिती अंतर्गत नागपुरात दरवर्षी खासदार करंडक एकांकिका स्पर्धां’चे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी 28 ते 30 ऑक्टोबर या स्पर्धा सादर केल्या जाणार आहेत.

या स्पर्धेअंतर्गत यंदा एकांकिका स्पर्धेत 24 एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून जवळपास 500 हून अधिक रंगकर्मीचा आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे.

तीन दिवस सादर होणार्‍या या स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभाचे ओटीटी व्यासपीठावरून जगभरात थेट प्रक्षेपण करण्याचा मानस असून यासाठी ‘अबास मीडिया’ या समूहाच्या ‘स्टेज टू स्क्रीन’ या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘प्लेक्सिगो’ ह्या अ‍ॅप द्वारे हे प्रक्षेपण केले जाणार आहे.