Published On : Tue, Dec 12th, 2017

खासदार सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमीवर जावून घेतले दर्शन


नागपूर: येथील दीक्षाभूमीवर जावून खासदार सुप्रिया सुळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे आणि भगवान गौतम बुध्दांचे दर्शन घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधी सुरु केलेल्या हल्लाबोल पदयात्रेचा समारोप सोमवारी नागपूर येथे झाला. गेले ११ दिवस पदयात्रा काढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे नागपूर येथे दाखल झाल्या आहेत.दीक्षाभूमीवर त्यांनी बुध्दवंदना केली. त्यांनतर त्यांनी ध्यानधारणाही केली.

आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दीक्षाभूमी जावून दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रकाश गजभिये, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.