Published On : Fri, Jun 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्यांच्याकर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

Advertisement

जळगाव– जळगाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शुक्रवारी (दि.२०), सकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या मार्गावरील पिंप्री गावात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, नुकसानग्रस्तांना सुधारित जीआर काढून हेक्टरी ४ हजार रुपये मदत द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी मरत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात कल्पिता पाटील, बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पाटील, संजय पाटील, हितेंद्र पाटील, अमोल हरपे, रियाज देशमुख आदींनी सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.