Published On : Mon, Oct 5th, 2020

मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

नागपुर / सावनेर – नागपूर ग्रामीण जिल्हायांतर्गत होणाऱ्या मोटर सायकल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिस पथक कसोशीने शोध घेत होते. अश्यातच सदर पथकास दिनांक ०३/१०/२०२० रोजी मुखबिराद्वारे माहिती मिळाली की, मौदा येथील लापका गाव राहणारा उमेश सोनवणे यांने त्याचे साथीदार, प्रमोद, प्रीतम ,विक्की, गोलू यांचेसोबत मिळून मौदा, रामटेक, भंडारा, आरोली या भागातून मोटर सायकल चोरी करून आणल्या व सदरचे वाहने त्याचे गॅरेजमध्ये लपवून ठेवलेले असून ते वाहने विक्री करीत बाहेरगावी घेवून जाणार आहे अशी खबर मिळाली.

प्राप्त झालेल्या खबरीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौदा तालुका अंतर्गत येणारे लापका या गावी जावून उमेश ऑटोमोबाईल या गॅरेजमध्ये छापा घातला असता त्यांचे हाती आरोपी उमेश शालिक्रम सोनवाने, वय २५ वर्षे,रा. झोपडपट्टी पावडदौना, तहसील मौदा जिल्हा नागपूर व त्याचे साथीदार प्रमोद राजू गजबे ,वय २२ वर्षे, प्रितम इंदल सोनवाने वय २० वर्षे,अविनाश उर्फ विक्की गजबे ,वय २४ वर्षे आणि अश्विन उर्फ गोलू इन्‍द्रपाल सोनवाने वय २६ वर्षे, सर्व रा. लापका ता. मौदा जि. नागपूर हे हाती लागले. उपरोक्त आरोपींताना ताब्यात घवून गॅरेजची पाहणी केली असता त्याठिकाणी बजाज पल्सर, हिरो होंडा पशन,ऍक्टिव्ह, बजाज प्लेटिना बजाज सि.टी १०० अशे विविध कंपन्यांचे एकूण १७ सायकल मोटर सायकल व २ मोटर सायकल इंजिन मिळून आले.

यासंदर्भात उमेश व त्यांचे साथीदारांस विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की,जानेवारी २०१९ ते आजपर्यंत त्यांनी नागपूर ग्रामीण भागातील मांढळ,खात, कोदामेंढी, मोरोडी, लापका, रामटेक तसेच, भंडारा जिल्ह्यातील लाखनी,जवाहर नगर, शहापूर आणि नागपूर शहरातील पारडी या भागातून या सर्व मोटर सायकल चोरी केलेले आहे. त्यांचे गॅरेजमध्ये मिळून आलेले मोटर सायकल दोन इंजिन सुद्धा चोरून आनलेल्या गाडीची कटिंग केल्यानंतर काढून ठेवलेले होते. मिळालेल्या माहिती वाहनाची तपासणी करून इंजिन नंबर व चेसीस नंबर नोंद करून त्या वाहनांची N.C.R. B च्या वाहन पोर्टलवरून माहिती घेतली असता सर्व वाहने ही चोरीचे असल्याचे निदर्शनास आले. प्राप्त वाहनाबाबत नागपूर ग्रामीण जिल्ह्यचे पोलीस स्टेशन मौदा, रामटेक तसेच जिल्हा भंडारा येथील पोलीस स्टेशन लाखनी व जवाहर नगर आणि नागपूर शहर येथील पोलीस स्टेशन वाडी व नंदनवन येथे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळून आली. आरोपी उमेश सोनवने व त्याचे इतर चारही साथीदारांकडून एकूण १२,३०,०००/- रुपयांची किमतीचे १७ मोटर सायकल आणि ०२ इंजिन असा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका
राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक
जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, पोलीस हवालदार नाना राऊत , महेश जाधव ,गजेंद्र चौधरी, सुरज परमार,निलेश बर्वे, राजेंद्र सनोंडीय, रमेश भोंयर,संतोष पंढरे, मदन आसतकर, पोलीस नायक दिनेश आधापुरे,रामराव आडे, पोलीस शिपाई अमोल वाघ,विपिन गायधने, प्रणय बनाफर, बालाजी साखरे, राधेश्याम कांबळे,महेश बिसेन,सतीश राठोड आणि चालक पोलीस हवालदार
भाऊराव खंडाते तसेच महिला पोलीस नायक अमोल कुथे यांचे पथकाने केली.