Published On : Fri, Sep 27th, 2019

कामठी तुन दुचाकी चोरी केलेल्या चोरट्यास मोर्शी तुन अटक

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथिल महावीर नगर रहिवासी फिर्यादीच्या घरासमोरून 4 सप्टेंबर ला रात्री साडे आठ दरम्यान नवीन शो रूम असलेली 1 लक्ष 22 हजार रुपये किमतीची टी व्ही एस कंपनीची लाल रंगाची अपाची दुचाकी क्र एम एच 40 बी डब्लू 7919 चोरीस गेल्याची घटना घडली होती यासंदर्भात फिर्यादी लोकेश शालीकराम काळे वय 23 वर्षे रा रणाळा कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा नोंदविला होता .

या गुन्हयातील चोरट्याचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असुन हा अट्टल चोरटा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी गावातील रहिवासी असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित मोर्शी गाव गाठून चोरट्यास अटक करन्यात आली असून अटक आरोपीचे नाव शिवम कैलासराव पांडे वय 22 वर्षे रा लक्ष्मी नगर मोर्शी जिल्हा अमरावती असे आहे या अटक आरोपी कडून चोरीस गेलेली 1 लक्ष 22 रुपये किमतीची लाल रंगाची अपाची दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची कारवाही काल करण्यात आली .

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी राजरतन बन्सोड, यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , गुन्हे पोलीस निरीक्षक आर आर पाल, पोलीस उपनिरीक्षक कांडेकर, यांच्या नेतृत्वात डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, सतीश ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी