नागपूर : शहरातील जामठा परिसरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील आरोपीचा तिसऱ्या दिवशीदेखील शोध लागू शकलेला नाही. आरोपीच्या शोधासाठी दोनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून विविध ठिकाणी शोध सुरू आहे.
मात्र अद्यापही पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले नाही. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्काराच्या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीत महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची यवतमाळची आहे. ती हिंगण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बुधवारी ती यवतमाळवरून बसने नागपुरात आली.
महाविद्यालय काही अंतरावर असल्यामुळे पायी जात होती. तो भाग जंगलाचा आहे. काही वेळातच एक गुराखी कुऱ्हाड घेऊन पाठलाग करायला लागला. त्याने तरुणीला गाठले त्यानंतर कुऱ्हाडीचा धाक दाखवून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





