Published On : Sat, Jul 27th, 2019

महा मेट्रो तर्फे आजवर सहा हजार पेक्षा जास्त सुरक्षा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Advertisement

मेट्रो अंतर्गत अधिकारी आणि बाह्य ताध्याच्या मार्फत दिले जाते प्रशिक्षण

नागपूर : महा मेट्रो नागपूर तर्फे स्थापित झालेल्या हिंगणा मार्गवरील सेफ्टी येथे सुरक्षा संबंधी उपाय योजनांचे प्रशिक्षण होत असून आतापर्यंत महा मेट्रो तर्फे एकूण तब्बल ६४५८ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मेट्रो अंतर्गत असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सुरक्षा तद्धच्या मार्फत ह्या वर्गाचे आयोजन झाले आहे.

महा मेट्रो तर्फे प्रत्येक आठवड्याला बुधवारी कामगारान करिता सेफ्टी पार्क येथे मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे प्रशिक्षण देण्यात येते. नागपूर मेट्रो मध्ये नेहमीच सुरक्षेला प्राथमिकता देण्यात आली आहे. तसेच वेळोवेळी त्या संबंधातील आढावा देखील घेतल्या जातो. जेव्हा मोठ्या प्रकल्पाचे कार्य सुरु असते तेव्हा कामगाराना सुरक्षेच्या दृष्टीने सतत प्रशिक्षण देणे गरजेचे असते. याच अनुषंगाने नागपूर मेट्रो येथे आतापर्यंत ६४५८ सुरक्षा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मेट्रो कामगारान करिता घेण्यात आले आहे. ज्यामध्ये बाह्य तथा मेट्रो तद्धनानी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

नागपूर मेट्रोच्या निर्माणाधीन चार ही रिच अंतर्गत कार्यालयामध्ये सेफ्टी रूम उपलब्ध आहेत. याशिवाय सेफ्टी पार्क येथे सुरक्षा उपक्रम चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सुरक्षा नियम उपयांचे मल्टीमीडिया तसेच डिजिटल टीव्ही,लेखन बोर्ड द्वारे प्रात्यक्षिकांसह प्रात्यक्षिक उपाय योजना आयोजित करण्यात येते. सेफ्टी पार्क येथे सुरक्षेचे प्रशिक्षण मेट्रो स्टाफ तसेच मेट्रो कंत्राटदार कामगारांना देण्यात येत आहे. लवकरच सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून सेफ्टी पार्क येथे नागरीकांन करिता रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात येईल.

महा मेट्रो तर्फे सदर *सुरक्षा प्रशिक्षण विषयांवर :* प्रशिक्षण आयोजित करण्यात येते
• मान्सून पूर्वक तयारी व उपाय योजना
• विद्युत सुरक्षा
• गर्डर लाँचिंग नियंत्रण व धोक्या दरम्यान उपाय

सेफ्टी पार्कची संरचना :
६०० चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर हे सेफ्टी पार्क तयार करण्यात आले आहे. या सेफ्टी पार्कमध्ये तीन षटकोनी संरचना वेगवेगळ्या उद्देशाने कार्य करते.