Published On : Thu, Jun 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात मान्सून दाखल, पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Advertisement

नागपूर :राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते.मात्र आता काड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मान्सूनचे वेळेआधीच महाराष्ट्रात आगमन झाले आहे, हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली.

मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात बरसेल,असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र आजच मान्सूनने महाराष्ट्रात धडक दिली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जरी करण्यात आला. कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.