Published On : Mon, May 27th, 2019

मान्सूनपूर्व नाले सफाई कामे अजूनही अधांतरी:-माजी उपाध्यक्ष अजय कदम

पावसाळा तोंडावर, नाले अजूनही अस्वच्छ

कामठी: दरवर्षी कामठी नगर परोषद च्या वतीने मान्सूनपूर्व नाला सफाई कामे युद्धस्तरावर राबविल्याचा गाजावाजा करीत लाखो रुपयांची उधळण केली जाते मात्र यावर्षी पावसाळा लागल्याच्या तोंडावर असूनही शहरातील बागडोर नाल्यासह इतर वस्तीतील नाल्यांची खोलीकरणं करून कुठलीही सफाई करण्यात न आल्याने नाल्यात जमलेल्या गाळ तसेच सांडपाण्यामुळे नाल्यात डुकरांच्या संचार असून नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांसह इतरांना बिनधास्त पणे रोगराईचे निमंत्रण देत आहे तर येथील नगर परिषद विभाग या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत असल्याने मान्सूनपूर्व नाले सफाई कामे हे अजूनही अधांतरी असल्याने पावसाळा तोंडावर तरीही नाले अस्वच्छ असल्याने स्थानिक नगर परोषद प्रशासनाने नाले सफाई कार्याला लवकरात लवकर गती देण्यात यावी अशी मागणी कामठी नगर परोषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी केले आहे.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी शहराच्याअ चहूबाजुनी नाल्यांचा वेढा असून बहुतांश प्रभागातून छोटा मोठा नाला वाहत असतो या नाल्यच्या माध्यमातून शहरातील सांडपाण्याची निकासी होत असते दरवर्षी पावसाळ्यात होणारी समस्या लक्षात घेता स्थानिक नगर परिषद च्या वतीने दरवर्षी मोठे बागडोर नाले सफाई सह शहरातील छोट्या मोठ्या नाल्याची सुद्धा सफाई होत असते मात्र यावर्षी प्रत्यक्षात नालेस्वच्छता झाले नसल्याचे वास्तव चित्र आहे ,नाल्यातील कचरा काढून त्यातील गाढ सुद्धा काढले नसून नाल्याची खोलीकरण सुद्धा केले नसल्याने परिसरात रोगराईचे वातावरण पसरत आहे.माजी उपाध्यक्ष अजय कदम यांच्या प्रभागातील नाल्याच्या सफाई व स्वच्छतेला अजूनही सुरुवात करण्यात आले नसल्याने या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे . तसेच या नाल्याच्या काठावर पडलेला कचरा हा दुर्गंधीयुक्त असून नागरिकाना या दुर्गंधीतून नाकी नऊ आले आहे यासंदर्भात स्थानिक नगर परिषद प्रशासनाला माहिती देऊनही या कचऱ्याची उचल करण्यात आली नाही तर पावसाळ्यात हेच नाले जलमय तुडुंब होत असतात परिणामी नगर परिषद ला तारेवरची कसरत करावी लागते तेव्हा भावी दृष्टिकोनातून पावसाळा लागण्याच्या तोंडावर असताना नागरी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून स्थानिक कामठी नगर परिषद प्रशासनाने नाला सफाई कार्याला गती देण्यात यावी अशी मागणी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement