Published On : Thu, Jun 28th, 2018

मोक्षधाम पुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटेल : महापौर

Advertisement

नागपूर: मोक्षधाम ते सरदार पटेल चौक ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नाग नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण गुरुवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.

उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप जाधव, नगरसेवक विजय चुटेले, किशोर जिचकार, प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, लता काडगाये, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, सहायक आयुक्त राजू भिवगडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कंत्राटदार मेडपल्लीवार, मनोज साबळे उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यानंतर नवनिर्मित पुलाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पणानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सर्व मान्यवरांनी पुलावरून पायी चालत पुलाचे निरीक्षण केले. याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मोक्षधाम ते ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नागनदीवरील पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना बराच त्रास झाला.

विशेष प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केलेत. आता हा पूल जनतेसाठी खुला झाल्याने या परिसरातील वाहतुकीतीची कोंडी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भर पावसात झालेल्या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची उपस्थिती होती.