अवैधरीत्या सुरू असलेल्या मोहफुलाच्या हात भट्टी वर धाड
एकूण 2,15,400 रुपयाचे मोहाफूला पासून दारू तयार करण्याचे साहित्य जप्त ,रामटेक पोलिसांची कारवाई
नागपुर: दिनांक 28 ला सकाळी गुप्त माहितीच्या आधारे नंदापुरी जंगलातील नाल्यामध्ये मोहाफूल दारूच्या हातभट्टीवर कारवाई करणेकामी मोहिम राबविली असता नंदापुरी जंगलातील नाल्यामधे प्रत्येकी 200 लिटर मोहफुलाच्या सडव्याने भरलेले 24 प्लास्टिक ड्र्म ,चार लोखंडी ड्रम ,चार लोखंडी चूल असा एकूण 2,15,400 रुपयाचे मोहफुला पासून दारू तयार करण्याचे साहित्य बेवारसरित्या मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावर नाश करण्यात आला .ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ,पोलीस उपनिरीक्षक राजू मूत्येपोड , पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकाटे , जाणराव बडवाईक ,सुरेश धुर्वे ,ओकेश मडावी ,सचीन चव्हाण ,गोपीनाथ बेंद्रे यांनी कारवाई केली .