Published On : Sat, Nov 18th, 2017

धर्मांतरासाठी मॉडेलवर दबाव; बेदम मारहाण

Advertisement

मुंबई : मुंबईत एका मॉडेलनं आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केला आहे. पती धर्म परिवर्तनासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप मॉडेल रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात बांद्रा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रश्मी शहबाजकर यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी आसिफ शहबाजकरशी झाला होता. त्यावेळी त्यानं पत्नीला लग्नानंतरही तू हिंदूच राहशील, धर्मपरिवर्तनासाठी कुठलाही दबाव टाकण्यात येणार नाही, असं सांगितलं.

लग्नानंतरच्या काही वर्षांमध्ये मात्र आसिफनं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि नकार दिल्यानंतर बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित मॉडेल रश्मीनं केला आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबईतील बांद्रा परिसरातल्या न्यू गार्डन व्ह्यू बिल्डींगमध्ये रश्मी शहबाजकर राहतात. तिथूनही हाकलून लावण्याची धमकी पतीने दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जेव्हा रश्मींनी धर्मांतर केलं नाही, तेव्हा आसिफने दुसरं लग्न केलं आणि त्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं, असा दावा रश्मी यांनी केला आहे. दुसऱ्या पत्नीने धर्मांतर करत मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती आहे.

Advertisement

पोलिसांनी कलम 354, 509, 324, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस हे ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण तर नाही ना, याचा शोध घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.