Advertisement
नागपूर: पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालिन परिस्थितीमध्ये नागरिकांना बचावकार्य व मदत पोहोचविण्यासाठी आज (शुक्रवारी) आपत्ती व्यवस्थापनातील इतर संस्थांच्या सहकार्याने फुटाळा तलावात सराव केला.
यात पुरात अडकलेल्या व्यक्तींना जीवन रक्षा प्रणालीच्या माध्यमातून वाचविणे तसेच नागरिकांना मदत कार्य पोहोचविण्याच्या सर्व साहित्य, यंत्रसामुग्री याचे प्रात्यक्षिके घेण्यात आली.
या
जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत पोलीस विभाग, अग्नीशमन विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आरोग्य विभाग, होमगार्ड व आपदामित्र या रंगीत तालमीत सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक समादेशक कृष्णा सोनटक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, एनडीआरएफचे वैभव शर्मा उपस्थित होते.
Advertisement