Published On : Fri, Mar 23rd, 2018

मनसेच्या पत्रकार परिषदेत गुप्तहेर


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचा गुप्तहेर आढळून आला असल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत साध्या वेशात पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित असल्याचे देशपांडे यांनी म्हटले असून त्याला विचारपूस केली असता त्याने पोलिस असल्याची कबुली दिल्याची ते म्हणाले.

या पोलिसाचे नाव जाधव असून ते रेल्वे पोलिसांचे गुप्तहेर असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले असून सुरुवातीला त्यांनी ओळख लपवली होती असे त्यांनी म्हटले आहे. मनसेच्या पत्रकार परिषदेत तसेच राज ठाकरे यांच्या घराचे देखील पोलीस साध्या वेशात येऊन मोबाईलमध्ये शूट करीत असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. हे लोकशाही विरोधात असल्याचे ते म्हणाले.