Published On : Tue, Mar 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल, महायुतीत सहभागी होणार?

Advertisement

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा शंखनाद झाल्यानंतर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढवणार आहेत. याकरीता मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले. यावरून मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज ठाकरे दिल्लीत अमित शाहा यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

मनसेकडून महाराष्ट्रात दोन जागांची मागणी करण्यात येऊ शकते. याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुका मनसे लढली नव्हती. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरेंनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघांची चाचपणीही सुरू केली आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची चिन्हे आहेत, असं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या जागेसाठी मनसेकडून बाळा नादगांवकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठका वाढल्या होत्या. त्यामुळे ते भाजपाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज ठाकरे आज दिल्लीत दाखल झाले असून ते उद्या अमित शाहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. या भेटीनंतर ते काय निर्णय जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges