Published On : Thu, Oct 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत मनसे आक्रमक; अधिष्ठातांना घेरले

Advertisement

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा सामोरे आला आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट मेडिकलच्या अधिष्ठातांना जाब विचारला.

मनसेकडून गुरुवारी नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील गैरसोयीबाबत निदर्शने करण्यात आली. मेडिकलमध्ये पर्याप्त औषधींचा साठा असतानाही रुग्णांना डॉक्टर औषधांची चिठ्ठी देतात. गरीब रुग्णांकडे आधीच पैशांचा आभाव आहे. मात्र तरीही त्यांना औषधा बाहेरून आणायला लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासह अनेक मुद्दे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठातांच्या समोर मांडले. यादरम्यान आंदोलक-अधिष्ठातांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे, चंदू लाडे, आदित्य दुरूगकर, दिलीप गायकवाड, उमेर बोरकर, शशांक गिरडे, गौरव पुरी, अंकित झाडे, प्रशांत निकम, उमेश उतखेड, चेतन बोरकुटे, अभिषेक माहुरे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.