Published On : Tue, Aug 22nd, 2023

नागपुरात ॲमेझॉनविरोधात मनसे आक्रमक ; पाकिस्तानचे झेंडे विकत असल्याने कार्यालयाची तोडफोड !

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) शहरातील ॲमेझॉनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.ॲमेझॉनवर ऑनलाईन पद्धतीने भारतात पाकिस्तानचे झेंडे विकले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. यावर संताप व्यक्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली.

ॲमेझॉन आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून पाकिस्तनाचे झेंडे हटवत नाही तोपर्यंत मनसे आंदोलन करणार असल्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. ॲमेझॉनकडून पाकिस्तानच्या झेंड्याची विक्री करणे म्हणजे असामाजिक तत्व आणि देशविरोधी कारवाई करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करणे आहे.

Advertisement

सर्व प्रथम मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील ॲमेझॉन कार्यालयात धडक दिली. मनसैनिकांनी आक्रमक होत कार्यालय आणि खुर्च्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच ‘भारत माता की जय’, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. जो पर्यंत ॲमेझॉन समस्त भारतीयांची माफी मागत नाही. तसेच आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून पाकिस्तनाचे झेंडे हटविल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्र लिहीत नाही. तोपर्यंत मनसैनिक शांत बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement