Published On : Tue, Feb 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मेडिकलच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन; अंगठी हिसकावल्याचा आरोप!

Advertisement

नागपूर : शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी गैरवर्तन करून तिची अंगठी जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय विद्यार्थी व डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमामवाडा भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ताराचंद खिल्लारे याचा मुलगा प्रतीक याच्यावर हा आरोप आहे. २१ फेब्रुवारीच्या सायंकाळी संबंधित विद्यार्थिनी आपल्या मित्रासह मेडिकल चौकात गेली असता आरोपी तेथे आला.

Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 160,600 /-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,66,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीशी ओळख काढण्याचा प्रयत्न करत तिच्याकडे इन्स्टाग्राम आयडीची मागणी केली. तिने नकार देत तेथून निघून जाण्यास सांगितले असता त्याने तिचा हात धरून ओढले व तिच्या बोटातील अंगठी काढून घेतल्याचा आरोप आहे. तिच्या मित्राने हस्तक्षेप केला असता आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर तरुणीने अजनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. दरम्यान, आरोपीनेही पोलिस ठाण्यात हजेरी लावत उलटपक्षी स्वतःवर मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटल्याचा दावा केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती तपासल्या असता तरुणांच्या समूहात बाचाबाची झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी प्रतीकविरुद्ध छेडछाड व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताराचंद खिल्लारे याच्याविरुद्ध यापूर्वी खूनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. प्रतीकवरही शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिस तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement