Published On : Wed, Apr 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अमरावती व्हिडिओ कांड प्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाने तत्काळ पावले उचलणार; प्यारे खान यांची माहिती

Advertisement


नागपूर : अमरावती जिल्ह्यातील गाजत असलेल्या व्हिडिओ प्रकरणात नवे तपशील समोर येत असून, आतापर्यंत ८ आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या सर्व व्हिडिओंमधील पीडित तरुणी मुस्लिम समाजातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अचलपूर येथून या प्रकरणाची तक्रार अल्पसंख्यांक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने तत्काळ पावले उचलली असून, आयोगाची टीम उद्या अमरावती येथे भेट देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे.

Gold Rate
Apr 272026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,200 /-
Gold 22 KT ₹ 1,42,500 /-
Silver/Kg ₹ 2,48,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका आयोगाने घेतली आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement