Published On : Thu, Jul 19th, 2018

दुध आंदोलनाचा प्रश्‍न सुटला नाहीतर गाई, म्हशीसह ठिय्या आंदोलन – सत्येकार

कन्हान : – खासदार राजू शेट्टी साहेब यांनी पुकारलेल्या दूध आंदोलनाचा प्रश्न सरकारने सोमवार २३ जुलै पर्यंत नाही सोडवला तर संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात गायी म्हशी सोबत घेऊन मुख्यमंत्राच्या बंगल्यावर ठिया आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी नेते संजय सत्येकार हयानी दिला आहे.

मा. खासदार राजु शेट्टी साहेबाने दिनांक १६ जुलै पासून शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन पुकारलेले आहे. आज चार दिवस होऊन सुद्ध्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका अजुन पर्यंत घेतलेली नाही.

सरकारने जर येणाऱ्या सोमवार २३ जुलै पर्यंत हा प्रश्न नाही सोडवला तर संजय सत्येकार शेतकरी नेते यांचा नेतृत्वात राज्याचा मुख्यमंत्राच्या नागपुर येथील बंगल्यावर गायी म्हशी सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. करिता सरकारने तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून हा प्रश्न सोडवावा.

अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्येकार ,भगवान यादव, आशिष पाटील, राजू गूड़धे, विनोद यादव, अरविंद यादव, गजानंद डांगरे, प्रभु हटवार, शेषराव देशमुख, सारंग हुड, आत्माराम श्रावनकर, रविन्द्र पुंडकर, मोरेश्वर श्रावनकर, राजेश मरदाना, मोनू यादव, विष्णु आगाशे, आंनद लिल्हारे, लक्ष्मण खंडार, सुनीता सतीकोसरे, किरणताई जगनेकर, कविताताई ढोबळे , आकाश उमाळे, किशोर सहारे, संजय सोनसरे, चंद्रभान येरणे, अमोल चकोले, संबा चकोले, निलखंट भोन्दे, शेषराव सौदागर, रामा चकोले, सुभाष नवघरे, आदी दुध उत्पादक शेतकऱ्यानी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेकड़ी बंद टोल नांका जवळील यादव यांच्या डेयरी वर गाई, म्हशी सोबत घेऊन आंदोलन करून घोषणा करण्यात आली . यावेळी इतर लोकांनी सुध्दा समर्थन जाहीर केले आहे.